📍 पाचोरा | प्रतिनिधी श्री.प्रमोद पाटील
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से. हायस्कूल येथे कार्यरत असलेले श्री. आर. बी. बोरसे यांची सांस्कृतिक विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते सांस्कृतिक उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अनुभवाचा व कार्यतत्परतेचा विचार करून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, तसेच विविध स्पर्धांमध्ये शाळेचे नाव उज्ज्वल व्हावे, या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या नियुक्तीप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन. आर. ठाकरे सर, उपमुख्याध्यापक श्री. आर. एल. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ. ए. आर. गोहिल मॅडम, तसेच श्री. आर. बी. बांठिया सर, श्री. एम. टी. कौंडिण्य सर आणि कार्यालयीन प्रमुख श्री. अजय सिनकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित शिक्षकांनी श्री.आर.बी.बोरसे सर यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक विभाग अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्या या नियुक्तीबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब श्री. दिलीप वाघ माजी आमदार पाचोरा – भडगाव मतदारसंघ, चेअरमन मा.नानासो.श्री संजय वाघ, मानद सचिव मा.दादासो ॲड.श्री.महेश देशमुख, व्हाईस चेअरमन मा.नानासो.श्री.व्ही. टी. जोशी, शालेय समिती चेअरमन मा. दादासो श्री खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा.अण्णासाहेब श्री.वासुदेव महाजन तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
