
पाचोरा | प्रतिनिधी
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूलने एसएससी परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले असून विद्यालयाचा ८७.२० टक्के निकाल जाहीर झाला आहे. विद्यालयातील प्रविष्ट झालेल्या ४६१ विद्यार्थ्यांपैकी ४०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह घवघवीत यश प्राप्त केलेले आहे.
विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
प्रथम: ललित बळवंत आंबेकर (९४.६%)
द्वितीय: हर्षल शैलेंद्र चौधरी (९३.४०%)
तृतीय: मोहित गणेश पाटील (९२%)
चतुर्थ: स्वरूप अशोक राठोड (९१%)
पाचवा: खुशी मनोहर सोनवणे (९०%)
संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भाऊसो. दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ, मानद सचिव दादासो. ॲड. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन नानासो. व्ही. टी. जोशी, शालेय समिती चेअरमन दादासो. खलील देशमुख यांच्यासह मुख्याध्यापक श्री. एन. आर. पाटील (ठाकरे) आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.




