पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांचा जागर करत शाळेची इमारत व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शाळेचा परिसर स्वच्छ केला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.आर.एल. पाटील, उपमुख्याध्यापक श्री.पी.एम. पाटील, पर्यवेक्षक श्री.आर.बी.बांठिया, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.आर.बी.बोरसे, क्रीडा प्रमुख श्री.एस.पी.करंदे, महिला प्रतिनिधी श्रीमती संगीता पाटील, कार्यालयीन प्रमुख श्री.अजय सिनकर, श्री.एस.एन.पाटील, विविध विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महात्मा गांधी यांनी दिलेला स्वच्छता, शिस्त व सामाजिक बांधिलकीचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून जपत शाळेच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
"मुख्य संपादक - महाराष्ट्र हेडलाईन्स न्यूज. सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक. सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेद्वारे जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न."