
पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल, पाचोरा दिनांक 17 सप्टेंबर 2026.रोजी येथील कलादालन येथे सकाळी दहा वाजता मुख्याध्यापक आर. एल.पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली” सेवा संकल्प अभियानांतर्गत ” विकसित भारत- 2047 भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी उपमुख्याध्यापक प्रीतमसिंग पाटील यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना विकसित भारत या संदर्भात राष्ट्रनिर्मिती, स्वच्छ व सक्षम भारत, पर्यावरण संवर्धन, तंत्रज्ञान,शिक्षण कौशल्य यांचे बाबतीत विद्यार्थ्यांनी चित्रांमध्ये समावेश करावा असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक सुनील भीवसने यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी मानले कार्यक्रमाला पर्यवेक्षिका अंजली गोहिल मॅडम, सांस्कृतिक प्रमुख रवींद्र बोरसे, रुपेश पाटील, ज्योती पाटील मॅडम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




