प्रतिनिधी : भडगाव, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिनिअर सिटीजन जनकल्याण संस्था, भडगावची त्रैमासिक सभा शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब श्री. अनिल पवार होते.यावेळी मावळते अध्यक्ष श्री. सी. आर. पवार यांनी संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मावळते सचिव श्री. एस. डी. पाटील यांनी विषयपत्रिकेवरील विविध विषय सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला..संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब श्री. अनिल पवार यांनी संस्थेचे हित, सर्वंकष विचार आणि संस्थेच्या पुढील वाटचालीचा विचार करून नवीन कार्यकारिणीची निवड केली. त्यामध्ये कार्यकारिणी खालील प्रमाणे.. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष : तात्यासाहेब श्री. भिकन मनोरे, उपाध्यक्ष : श्री. बापूसाहेब बाळासाहेब जयवंतराव पवार, सचिव : आप्पासाहेब श्री. चेंडूराम राजाराम पवार, सहसचिव : दादासाहेब श्री. संजय वसंतराव देशमुख, खजिनदार : दादासाहेब श्री. सुभाष एकनाथ पाटील, समन्वयक : श्री. अण्णासाहेब गुलाबराव नामदेव जाधवसंस्थाअंतर्गत लेखापरीक्षक : आप्पासाहेब श्री. राजू परशुराम शेजवळ, नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा उपस्थित संचालकांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच मावळत्या पदाधिकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी श्री. सी. आर. पवार व श्री. एस. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात तात्यासाहेब श्री. अनिल पवार यांनी संस्थेच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करून ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. विषयपत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. अध्यक्षीय समारोपानंतर सभेची सांगता झाली.नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. भिकन मनोरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
"मुख्य संपादक - महाराष्ट्र हेडलाईन्स न्यूज. सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक. सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेद्वारे जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न."