
प्रतिनिधी : पाचोरा
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विद्यमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव तसेच प्रताप महाविद्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय ज्युडो क्रीडा स्पर्धा २०२६-२७ प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत श्री.गो.से. हायस्कूल, पाचोरा येथील विद्यार्थिनी कु.शगुन संदिप पाटील उत्कृष्ट कामगिरी करत १४ वर्षांखालील वयोगटातील ४० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय शालेय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली.
श्री.गो.से. हायस्कूलच्या विद्यार्थिनीने स्पर्धेत आत्मविश्वासाने खेळ करत प्रभावी डावपेच, उत्तम तंत्र आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. आपल्या ४० किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत तिने विजेतेपद पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मा.भाऊसो.श्री. दिलीप वाघ, चेअरमन मा. नानासाहेब श्री. संजय वाघ, मानद सचिव माननीय दादासो. श्री.महेश देशमुख, व्हाईस चेअरमन माननीय नानासो. श्री.व्ही. टी. जोशी, स्थानिक कमिटी चेअरमन दादासाहेब श्री.. खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा. अण्णासाहेब श्री. वासुदेव महाजन यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एल. पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री. पी. एम. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ. ए. आर. गोहिल मॅडम, पर्यवेक्षक श्री. आर. बी. बांठिया सर आणि पर्यवेक्षक श्री. एम. टी. कौंडिण्य सर , क्रीडा विभाग प्रमुख श्री.एस.पी.करंदे, सांस्कृतीक विभाग प्रमुख श्री.आर.बी.बोरसे सर यांनी तिच्या यशाचे कौतुक करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या यशानिमित्त शाळेत कु.शगुन संदिप पाटील विद्यार्थिनीचा मुख्याध्यापक श्री. आर. एल. पाटील सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या कामगिरीचे कौतुक करत आगामी विभागीय स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थिनीच्या या यशासाठी क्रीडा शिक्षक श्री. संदिप मनोरे सर व श्री.महेश चिंचोले सर ज्युडो प्रशिक्षक श्री. दिनेश पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
शाळेच्या क्रीडा विभागामार्फत विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करावी, यासाठी क्रीडा क्षेत्राला विशेष महत्त्व दिले जात आहे. ज्युडो स्पर्धेतील या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली असून, विभागीय स्पर्धेसाठी तिच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




