
पाचोरा (प्रतिनिधी) श्री.प्रमोद पाटील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा येथील ज्येष्ठ, अनुभवी व विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले शिक्षक श्री. आर. एन. सपकाळे यांची शाळेच्या सांस्कृतिक उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शाळेतील सांस्कृतिक उपक्रमांना नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
सपकाळे सर यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, नाट्य, वक्तृत्व, संगीत आणि कला क्षेत्रातील उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या नियुक्तीप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन. आर. ठाकरे, उपमुख्याध्यापक श्री. आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ. ए. आर. गोहिल, श्री. आर. बी. बांठिया, श्री. एम. टी. कौंडिण्य, क्रीडा प्रमुख श्री. एस. पी. करंदे तसेच कार्यालयीन प्रमुख श्री. अजय सिनकर आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन सपकाळे सरांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या निवडीबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. दिलीप वाघ, चेअरमन मा. श्री. संजय वाघ, मानद सचिव मा. अॅड. श्री. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन मा. श्री. व्ही. टी. जोशी, शालेय समिती चेअरमन मा. श्री. खलील देशमुख तसेच तांत्रिक विभागाचे चेअरमन मा. श्री. वासुदेव महाजन यांनी अभिनंदन केले आहे. संस्थेच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही आनंद व्यक्त करत सपकाळे सरांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सांस्कृतिक उपविभाग प्रमुख म्हणून सपकाळे सर विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा व सांस्कृतिक गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबवणार असून शाळेची सांस्कृतिक परंपरा अधिक समृद्ध करण्याचा त्यांचा मानस असल्याचे समजते. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा सांस्कृतिक क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







