
प्रतिनिधी – पुणे :
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने पुणे जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी श्री. सचिन नाळे तसेच जिल्हा सचिवपदी श्री. रणजीत देवकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पुणे जिल्ह्यातील शारीरिक शिक्षण क्षेत्राला नवे नेतृत्व लाभले असून शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.शारीरिक शिक्षण विषयाची गुणवत्ता वाढविणे, शिक्षकांच्या समस्या सोडविणे, तसेच क्रीडा संस्कृतीचा प्रसार करणे या उद्देशाने महासंघ राज्यभर संघटन मजबूत करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यांमध्ये कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू असून पुणे जिल्ह्याची निवड सभा नुकतीच उत्साहात पार पडली.
ही निवड प्रक्रिया महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संदीप मनोरे व राज्य सचिव मा. प्रा. तायाप्पा शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या विस्ताराला गती मिळत असून राज्यभर शिक्षकांचे जाळे अधिक बळकट होत आहे.
नवीन जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
जिल्हाध्यक्ष – श्री. सचिन नाळे
जिल्हा उपाध्यक्ष – श्री. राकेश यादव, श्री. सुदर्शन माने, श्री. महादेव टकले
कार्याध्यक्ष – श्री. सोमनाथ नलवडे
जिल्हा सचिव – श्री. रणजीत देवकर
सहसचिव – श्री. ऋषिकेश खोमणे, श्री. अमित गावडे, श्री. अभिजीत साळुंके
खजिनदार – श्री. सोमनाथ कोठावळे
सहखजिनदार – श्री. नवनाथ गायकवाड, श्री. गणेश गव्हाणे, सौ. तेजश्री शिंदेजिल्हा संघटक – श्री. मंदार कळसकर, श्री. मोहन कचरे, श्री. अतुल जगताप, श्री. साहिल बागवान, श्री. अमित परब, श्री. सुरज माने, श्री. हर्षल मुळे, श्री. सचिन काशीद, श्री. सागर पवार, श्री. लक्ष्मण गावडे, सौ. मोनाली काळे, सौ. साधना खोमणे, सौ. संगीता ढगे, सौ. ज्योती उदावंत
जिल्हा सदस्य :
श्री. सचिन सूर्यवंशी, श्री. विशाल शेंडगे, श्री. विशाल हडंबर, श्री. नितीन शेटे, श्री. अमोल नाळे, श्री. हर्षल मुळे, श्री. मनोज मदने, श्री. स्वप्निल बोराटे, श्री. धनंजय यादव, श्री. ऋषिकेश लोणकर, श्री. धीरज हिरवे, श्री. लक्ष्मण किसवे, श्री. प्रज्वल सावक, श्री. वैभव जगताप, श्री. आरती काळभोर, कुमारी नीला कांबळे, सौ. संगीता तरवळप्रसिद्धी विभाग : जिल्हा प्रसिद्धी प्रमुख – श्री. मनोज डोंबाळे, श्री. वैभव जगताप, श्री. युवराज देवकर, श्री. वैभव ठोंबरे
सह प्रसिद्धी प्रमुख – श्री. अभिजीत चव्हाण, श्री. मयूर जराडमहासंघाच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्हे व तालुक्यांमध्ये कार्यकारिणी स्थापन करण्याचे काम वेगाने सुरू असून पुणे जिल्ह्याची निवड प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या नव्या कार्यकारिणीमुळे शारीरिक शिक्षण क्षेत्राला अधिक बळ मिळणार असून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्यातील शिक्षक, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी व संचालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
बातमी आवडल्यास नक्की शेअर करा! अशाच नवनवीन आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच ‘महाराष्ट्र हेडलाईन न्यूज नेटवर्क’ ला फॉलो करा, लाईक करा.







